प्रज्ञा सूर्य | newsforum
©संजय वासनिक, चेंबुर, मुबंई
गज़ल
होता जरी सूर्य आमुचा
काजव्याच्या जगात जगलो आम्ही …
वतने जरी नावे होती आमुच्या
वतनदार कधिच नव्हतो आम्ही …
राहुन गाव वेशीच्या बाहेर
गढीचे रखवालदार होतो आम्ही …
निद्रेत आभाळ पांघरुनी
मातीत झोपलो आम्ही …
शेणाच्या लिंपनाचे अंथरुणात
उपाशी पोटी लोळलो आम्ही …
तहानेने व्याकुळ होता
आसवेंच प्यालो आम्ही …
अन्नांचा कण ही नसतांना
ज्ञानाने पोट भरलो आम्ही …
कधीतरी एका पहाटे
ज्ञान सुर्याच्या प्रेरणेने
जगण्यास शिकलो आम्ही …
बाबा तुझ्या शिकवणीने
शिकविण्यास शिकलो आम्ही …